अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- रामदेव बाबा म्हणतात मी करोनाची लस घेणार नाही,मला त्याची गरज नाही ! मी कोरोना लस घेणार नाही, मला त्याची गरज नाही, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
करोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे असंही बाबा रामदेव म्हणाले.मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. मला करोना होणार नाही. मी लसीचा वापर करणार नाही कारण मला याची गरज नाही.
करोनाचा कुठलाही अवतार येऊ देत आमचा योगावतार जिंदाबाद आहे असे बाबा रामदेव यांनी एका मुलाखतीदरम्यान ही प्रतिक्रिया दिली.मी लसीचा विरोध करत नाही पण अद्याप हे समोर आलेलं नाही की लस सहा महिन्यानंतर किती प्रतिकारशक्ती राखून ठेवते.
मात्र, योगासनं केल्यास प्रतिकारशक्ती कायमच राखली जाईल असा सल्लाही त्यांनी दिला.करोना प्रतिबंधक लसीमध्ये गायीची किंवा डुक्कराचीही चरबी नाही. हा हिंदू किंवा मुसलमानांचा विषय नाही. हा शुद्ध स्वरुपात वैज्ञानिक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे याला कोणत्याही धर्माशी जोडता कामा नये असेही बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले.