VIDEO NEWS : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- मोबाइलमध्ये असलेले मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नगरमध्ये घडला आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून प्रवीण दिलीप जाधव याच्या विरुद्ध कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडित मुलगी व आरोपी हे शेजारी-शेजारी रहायला आहेत. ते एकमेंकाचे ओळखीचे असल्याने मुलीबरोबर आरोपीने फोटो काढले होते. याच फोटोंचा वापर करून आरोपीनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

मुलीने शरिरसंबंधास नकार दिल्याने आरोपीने मोबाइलमध्ये असलेले दोघांचे फोटो व्हायरल करून करून बदनामी करेल, अशी धमकी देऊन अत्याचार केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24