महाराष्ट्र

‘सामना’तून घाणाघात सुरूच, राऊतांच्या अटकेनंतरही बाज कायम

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra Politics : इडीने पत्राचाळ प्रकरणात अटक केलेले शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत हे ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादकही आहेत. त्यांच्या अग्रलेखांची विशेष चर्चा असते. त्यांच्या अटकेनंतर अग्रलेख कोण लिहिणार, कसे असतील याची उत्सुकता होती.

राऊतांच्या अटकेनंतर आज पहिला अग्रलेख आला. त्यातून राज्यपाल आणि भाजपवर सडेतोड टीका करून राऊतांच्या अटकेनंतरही बाज कायम असल्याचे दाखवून दिले आहे. राऊत यांच्या घरी काल सकळाची इडीने छापा घातला. त्यानंतर त्यांना तेथून ताब्यात घेण्यात आले आणि रात्री अटक करण्यात आली.

त्यामुळे त्यांच्या गैरजेरीत अग्रलेख कसा असेल, याची उत्सुकता होती. मात्र, सामनाने आज तरी यात कमतरता ठेवली नसल्याचे दिसून येते. राज्यपाल की….? अशा शीषर्काखाली अग्रलेख लिहिण्यात आला आहे. ‘संजय राऊत यांनी राज्यपालांच्या विधानाचा प्रखर शब्दांत शनिवारी समाचार घेतला व रविवारी सकाळी त्यांच्या घरी ‘ईडी’ची पथके पोहोचली.

लोक काय ते समजून गेले. भाजप प्रत्येक गोष्ट पैसा, संपत्ती, व्यापारातच तोलतो. त्यामुळे त्यांना रक्त, घाम, अश्रूंचे मोल नाही. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजप विचारांच्या लोकांचा सहभाग नव्हता. त्याचप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्राच्या लढ्यातही भाजप परिवार कोठेच नसल्याने त्यांना मराठी अस्मिता कशाशी खातात ते माहीत नाही. अशी टीका करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office