अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार २४१ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८५ ने वाढ झाली.

यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४९१ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ५२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८४ आणि अँटीजेन चाचणीत १४९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २३, जामखेड ०२, नगर ग्रामीण ०७, नेवासा ०३, पारनेर ०२, पाथर्डी ०२, राहाता ०१, राहुरी ०५, संगमनेर ०१, शेवगाव ०१,

श्रीगोंदा ०२, कॅंटोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १९,

अकोले ०२, जामखेड ०१, कर्जत ०१, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०१, पारनेर ०४, पाथर्डी ०४, राहाता १०, राहुरी ०९, संगमनेर ०७, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०९, कॅंटोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १४९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा २२, अकोले १४, जामखेड ०५,, कर्जत १४, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०१, पारनेर ०८,

पाथर्डी ३०, राहाता १२, राहुरी ०३, संगमनेर १६, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०७, श्रीरामपूर ०२ आणि कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ८५, अकोले ३४, जामखेड ०५, कर्जत ०८,

कोपरगाव ०४, नगर ग्रा ३०, नेवासा ०४, पारनेर १९, पाथर्डी ४८, राहाता १५, राहुरी १०, संगमनेर ३२, शेवगाव १७, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर १२, कॅन्टोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ०३ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:५३२९१

उपचार सुरू असलेले रूग्ण: १४९१

मृत्यू:८५३ एकूण रूग्ण संख्या:५५६३५

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24