महाराष्ट्र

Mhada News: मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण; म्हाडा मुंबईत उभारणार तब्बल 3 हजार 600 घरे, राज्यातील ‘या’ ठिकाणीही उभारली जाणार घरे

Published by
Ajay Patil

Mhada News:- मुंबई तसेच पुणे व इतर मोठ्या शहरांमध्ये स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाच्या स्वप्न असते व हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. परंतु घरांच्या वाढत्या किमती पाहता बऱ्याच जणांना हे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य होत नाही.

परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून नागरिकांना मदत होते. तुम्हाला माहिती आहे की या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून अनेक घरे उभारली जातात व सोडतीच्या माध्यमातून ही घरे परवडणाऱ्या किमतींमध्ये नागरिकांना मिळू शकतात.

अगदी याच पद्धतीने तुमचे देखील मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घर घ्यायचे स्वप्न असेल तर म्हाडाच्या माध्यमातून लवकरच ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 मुंबईत म्हाडा उभारणार तीन हजार सहाशे घरे

याबाबत सविस्तर वृत्त असे की, म्हाडाच्या माध्यमातून  येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईत तीन हजार सहाशे नव्या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या घरांसाठी विविध उत्पन्न गटातील नागरिकांना अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये म्हाडाच्या माध्यमातून गोरेगाव,

कन्नमवार नगर तसेच अँटॉप हिल, पवई आणि मागाठाणे या भागामध्ये या घरांची उभारणी केली जाणार आहे.  घरांची उभारणी झाल्यानंतर येणाऱ्या कालावधीत म्हाडाकडून या घरांसाठी सोडत जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे अनेकांना मोठ्या शहरांमध्ये किंवा मुंबईमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.

 या 150 घरांचा देखील होऊ शकतो समावेश

मागच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून 4082 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली होती व सोडत काढण्यात देखील आली. परंतु या एकूण 4082 घरांमधून 150 घरांची विक्री अजून पर्यंत झालेली नाही.

मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण; म्हाडा मुंबईत उभारणार तब्बल 3 हजार 600 घरे त्यामुळे या सोडतीतील प्रतीक्षा यादीत ज्या अर्जदारांचे नाव असतील त्यांना ही घरे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे व या पद्धतीने जर परत या घरांची विक्री झाली नाही तर येणाऱ्या कालावधीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या 3600 घरांमध्ये या 150 घरांचा देखील समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

 या व्यतिरिक्त राज्यात या ठिकाणी उभारली जाणार घरे

सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये म्हाडाच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरच नाहीतर महाराष्ट्रातील कोकण तसेच पुणे, छत्रपती संभाजीनगर, नासिक,  अमरावती आणि नागपूर या ठिकाणी देखील घरांची उभारणी केली जाणार आहे व त्यामुळे या सोडतींवर देखील अनेक नागरिकांचे लक्ष असणार आहे.

Ajay Patil