महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचे भवितव्यबद्दल काय म्हणाले महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, वाचा सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :-  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्याप मिटण्याचे नाव घेत नसले तरी, काही कर्मचारी कामावर रूजू झाले आहे. तसेच बहुतांश कर्मचारी अद्यापही आंदोलनावर ठाम असल्याने, एसटी महामंडळाने अनेक कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती, बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे.

याबाबत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी स्वतः आकडेवारी माध्यमांसमोर ठेवली आहे. आजपर्यंत 3 हजार 100 कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले असून, तसेच संप केल्यामुळे या काळात तब्बल 5 हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त केल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

संप सुरू झाला होता यावेळी 92 हजार कर्मचारी पटलावर होते, दोन हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती झाली होती. तसेच आजपर्यंत 3 हजार 100 कर्मचारी सेवेतून बडतर्फ झाले आहेत. तसेच संप केल्यामुळे या काळात तब्बल 5 हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त केल्याची माहितीही महामंडळाचे व्यवस्थापकीयांनी दिली आहे.

साधारण 87 ते 88 हजार कर्मचारी सध्या पटावर आहेत, त्यातील 26 हजार 500 कर्मचारी कामवर असल्याचे सांगण्यात आले आहे. एसटीचे 37 आगार पूर्ण बंद आहेत, तर उर्वरीत आगार कमी क्षमतेने सुरू आहेत. यासंदर्भात शेखर चन्ने बोलताना म्हणाले की, बडतर्फ कामगारांना पुन्हा सेवेत घेता येत नाही,

बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्यासाठी काही प्रक्रिया आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी देखील आधी सांगितलं होते की, बडतर्फ झाल्यावर त्याला कामावर घेता येत नाही. ती तेवढी सोपी प्रक्रिया नाही. म्हणूनच कर्मचाऱ्यांना आमचं आवाहन आहे की, अशाप्रकारची कारवाई त्यांच्यावर करण्याची वेळ येऊ नये.

त्यांना यातून पुढे त्रास होऊ नये म्हणून त्यांनी कामावर पुन्हा रूजू झालं पाहिजे. बरेचश्या कर्मचाऱ्यांची कामावर हजर होण्याची इच्छा असून, ते रुजू होत आहेत. सध्या महाराष्ट्रात सकारात्मक चित्र दिसून येत आहे, असं शेखर चन्ने यांनी नमूद केलं. एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले, तर त्यांच्यावर कारवाई करणार नाही.

७५० खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यात येत आहेत. जे सेवानिवृत्त झाले आहेत, ज्यांचे वय ६२ पेक्षा कमी आहे, जे फिट आहेत त्यांना काही काळ कामासाठी घेणार आहोत. एसटी सेवा प्रवाशांना मिळावी हा खासगी चालक कंत्राटी पद्धतीने घेण्यामागचा हेतू आहे, असंही चन्ने यांनी सांगितले आहे.

Ahmednagarlive24 Office