लँडलाईनवरून मोबाईल क्रमांक डायल करण्यापूर्वी ही बातमी वाचाच …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- १५ जानेवारीपासून लँडलाईनवरून मोबाईलवर कॉल करण्याचा नियम बदलला असून, यापुढे लँडलाईनवरून मोबाईल क्रमांक डायल करण्यापूर्वी शून्य लावणे बंधनकारक झाले आहे.

केंद्रिय दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी मुदत दिली होती. २०२० मध्ये भारतीय नियामक मंडळाने मोबाईल क्रमांकाच्या आधी शून्य क्रमांक लावण्याची शिफारस केली होती. त्यानंतर दूरसंचार विभागाने हा प्रस्ताव मान्य केला होता.

त्यामुळे १५ जानेवारी २० २१ पासून लँडलाईनवरून शून्य दाबणे बंधनकारक झाले आहे. या बदलामुळे विविध दूरसंचर कंपन्यांचा फायदा होणार असून, त्यांना जवळपास २५३.९ कोटींच्या आसपास अतिरिक्त क्रमांक बनवता येणे शक्य होणार आहे.

विविध टेलिकॉम कंपन्या आपल्या लँडलाईन ग्राहकांना या नवीन बदलाचे संदेश पाठवून त्यांना जागरूक करण्याचे काम करत आहेत. असे असले तरी लँडलाईनवरून लँडलाईन किवा मोबाईलवरून लॅडलाईनवर फोन करण्याच्या पद्धतीत बदल झालेला नाही.

अहमदनगर लाईव्ह 24