अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रलियावर ८ गाडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.त्यामुळे भारताने पण १-१ अशी मालिकेत बरोबरी साधली आहे. अजिंक्य रहाणेने पदार्पण केलेल्या मोहम्मद सिराजकडून चांगली कामगिरी करून घेतली आहे.
सिराजने दुसऱ्या डावात तीन विकेट घेतल्या आहेत. भारताने ऑस्ट्रेलियाचे ७० धावांचे लक्ष सहज पार केले. या सामन्यात अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली.
त्याला या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच हा सन्मान दिला गेला. उल्लेखनीय म्हणजे ‘Mullagh मेडल’ ने त्याचा सन्मान केला गेला.
हे पदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू बनण्याचा मन त्याने पटकावला. सचिन तेंडुलकरनंतर बॉक्सिंग कसोटी सामन्यात शतक करणारा अजिंक्य दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. अजिंक्य रहाणेचा जन्म एका मध्यमवर्गीय घराण्यात झाला. स्वतःच्या परिश्रमाने त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले.
पण त्याच्या आयुष्याला वळण लागायला एक मेसेज कारणीभूत असेल हे फार कमी लोकांना माहित असेल. हि घटना दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील असून त्याच्या कारकिर्दीला टर्निंग द्यायला कारणीभूत ठरली. २९ डिसेंबर २०१३ ची हि घटना आहे. डरबान कसोटीत अजिंक्यचे शतक चार धावांनी हुकले होते.
त्याच दिवशी तो अस्वस्थ असताना त्याला एक मेसेज आला.’कसोटी क्रिकेट काय आहे आणि शक्यच मोल काय असत,याची जाणीव तुला झाली असेल,’असा तो मेसेज होता. त्यानंतर त्याने त्या मेसेजला “मी तुम्हाला शतकाची फार वाट पाहायला लावणार नाही” असा उत्तर दिल होत.
तो मेसेज पाठवणार खेळाडू सचिन तेंडुलकर होता. त्यानंतर त्याने १४ फेब्रुवारी २०१४ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर ११८ धावांची खेळी केली होती.