महाराष्ट्र

शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्राप्त

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या संबंधीने नव्या शासन निर्णयानुसार बदलीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले आहे.

त्यानुसार राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना बदली संबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान यापूर्वी युती सरकारच्या काळात राज्यात ऑनलाईन बदलीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

मात्र त्या बदलीच्या प्रक्रियेत काही उणिवा असल्याचा आक्षेप शिक्षक संघटनांनी नोंदविला होता. तत्कालीन सरकारने संबंधित आदेशात बदल करण्यास नकार दिला.

त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यांनी राज्यातील विविध शिक्षक संघटनांच्या सोबत चर्चा करून प्रक्रियेच्या संबंधीचे तयार केलेल्या अहवालाला अंतिम स्वरूप दिले.

त्यासंबंधी नव्याने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. कोरोनामुळे गेले दोन वर्ष शिक्षकांची बदली प्रक्रिया होऊ शकलेली नाही.

दरम्यान राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाने जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बदली संबंधी ने माहिती प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे यावर्षी शिक्षकांच्या बदल्या होणार हे निश्चित झाले आहेत. यावर्षी होणार्‍या सर्व बदल्या सात एप्रिल 2019 च्या शासन निर्णयाप्रमाणे होणार असल्याचेही निश्चित करण्यात आले आहेत.

तर राज्यातील प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया या वर्षी एक मार्चपासून सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या संदर्भाने राज्य शासन पूर्ण तयारी लागले आहेत.

Ahmednagarlive24 Office