जिल्ह्यातील या तालुक्यात सर्वाधिक रॅपिड अँटीजेन चाचण्यांची नोंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे. यामुळे जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या सुरुवातीला जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची वाढ होणाऱ्या तालुक्यांमध्ये अग्रेसर असलेल्या संगमनेर तालुक्यामधील

अर्ध्याहून अधिक गावे आता कोरोनामुक्त झाली आहे. दरम्यान सर्वाधिक लोकसंख्येच्या अहमदनगर महापालिका क्षेत्रापेक्षा संगमनेर तालुक्यात रॅपिड अँटीजेनच्या चाचण्या अधिक प्रमाणात करण्यात आल्या असून त्याद्वारे समोर आलेला पॉझिटिव्ह निष्कर्षही नगरपेक्षा खूप कमी आहे.

तालुक्याची रुग्णसंख्या आता 4 हजार 226 वर पोहोचली आहे. शुक्रवारी (ता.30) रॅपिड अँटीजेनद्वारा केवळ दोघांचे तर खासगी प्रयोगशाळेकडून बारा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

आत्तापर्यंत संगमनेर तालुक्यातील 14 हजार 324 जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून त्यातून 14.58 च्या गतीने 2 हजार 88 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 12 हजार 236 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.

संक्रमित झालेले रुग्ण जलदगतीने समोर येवून कोविडचा प्रादुर्भाव रोखता यावा यासाठी झटपट निष्कर्ष देणार्‍या रॅपिड अँटीजेनचा वापर करुन राज्यभर कोविड विरोधातील लढ्याला बळ देण्यात आले. या लढाईत अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरने प्रथम क्रमांक पटकाविला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24