अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सलग दुसर्या दिवशी विक्रमी रुग्णवाढ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  अहमदनगर जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असल्याने चिंताही वाढली आहे. गेल्या २४ तासांत ८५७ नव्या बाधितांची नोंद झाली. यामध्ये नगर शहरातील २९१ रुग्णांचा समावेश आहे.

ग्रामीण भागात राहात्याची स्थिती वाईट असून तेथे १११ नवे रुग्ण आढळून आले आहेत. उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता चार हजारपर्यंत पोहोचली आहे.

गेल्या 24 तासांमध्ये 857 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक रुग्ण आहेत. नगर शहरातील बाधितांचा आकडा तीनशे जवळ पाेहाेचला आहे. नगर शहरात गेल्या 24 तासांमध्ये 291 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

वाढत्या बाधितांमुळे उपचारार्थींचा आकडा चार हजारच्या उंबरठ्याजवळ पाेहाेचला. गेल्या 24 तासांमध्ये वाढलेल्या उच्चांकी आकड्यामध्ये सर्वाधिक बाधित रुग्ण हे अहमदनगर शहरापाठाेपाठ राहाता तालुक्यात आहेत.

अहमदनगर शहर 291, राहाता 111, संगमनेर 84, काेपरगाव 76, श्रीरामपूर 52, जामखेड 37, नगर तालुका 34, नेवासे 27, राहुरी 26, पारनेर 21, पाथर्डी 19, कर्जत 18, शेवगाव 15, भिंगार शहर 15,

अकाेले 14, श्रीगाेंदे 06, इतर जिल्ह्यातील 11 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या प्रयाेगशाळेनुसार 319, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 475 आणि रॅपिड चाचणीनुसार 63 जणांना काेराेना संसर्ग झाला आहे.

दरम्यान जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घाईघाईने घेतला जाणार नाही, त्यापेक्षा उपाययोजना आणखी कडक करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24