अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील कांद्याची झालेली आवक यामुळे एक नवीनच विक्रम केला आहे.
घोडेगाव येथे 60 हजारांहून अधिक कांदागोण्यांची आवक झाली. त्यात क्रमांक एकच्या कांद्यास 3500 ते 4200 रुपये क्विंटल भाव मिळाला.आजच्या लिलावात नऊ कोटींची उलाढाल झाली.
सकाळपासूनच घोडेगाव बाजारात छोटी-मोठी वाहने कांदा घेऊन येत होती. रात्री उशिरापर्यंत आवक सुरू होती. अचानक कांदा घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने बाजार समितीबाहेर एक किमीपर्यंत रांग लागली होती.
त्यामुळे बाजार समिती प्रशासन, पोलिसांची धांदल उडाली होती. लिलावाच्या दिवशी सकाळीही कांदा घेऊन येणाऱ्या वाहनांची गर्दी होती.
सकाळी साडेसातलाच नगर-औरंगाबाद रस्त्यावर कांदा गोणी घेऊन आलेल्या वाहनांची अर्धा किमी रांग लागली होती.दरम्यान जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली होती.
यामुळे बाजार समितीच्या आवारात पाणी साचले असून, दलदल झाली आहे.त्यात शेतकऱ्यांची अडतदाराकडे माल लावायची लगबग सुरू असल्यामुळे आज दुपारपर्यंत आवारात गोंधळ उडाला होता.
बाहेरची आवक वाढल्याने आज कोणीही कांदा आणू नये, असे आवाहन करावे लागल्याचे अडतदार सुदाम तागड यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved