महाराष्ट्र

Maharashtra News : राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक ! ५० हजार शिक्षकांची लवकरच भरती

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच ५० हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही, असे मंत्री केसरकर यांनी म्हटले आहे. केसरकर यांच्या या घोषणेमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

गणवेशाची जबाबदारी शालेय समितीवर

विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत केसरकर यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार आहे. गणवेश अगोदरच शिवले होते, आता एकसारखा गणवेश देण्यात येणार आहे.

त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे. आधी एका गणवेशाचे वाटप करण्यात यावे. नंतर दुसरा गणवेश देण्यात यावा. गणेशावाचून एकही विद्यार्थी राहता कामा नये, अशा सूचनाही यावेळी केसरकर यांनी दिल्या.

बेलगाम वक्तव्याचा उद्या समाचार घेणार!

शिवसेनेचे प्रवक्ते, मंत्री दीपक केसरकर हे मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देणार आहेत. ठाकरे यांनी बंडखोरांबाबत बेलगाम आणि बेजबाबदार वक्तव्ये केली आहेत. परंतु आज शाहू जयंतीदिनी मी याबद्दल काही प्रतिक्रिया देणार नसल्याचे केसरकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

केसरकर म्हणाले, आम्ही जेव्हा सत्तांतर झाल्यानंतर मुंबईत आलो तेव्हा बैठकीत ठरले होते की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा कुटुंबीयांबद्दल कोणतीही टीका करायचे नाही, असे निश्चित केले होते. परंतु त्यांनीच आता ताळतंत्र सोडला आहे.

ज्या पद्धतीने आदित्य टीका करत आहेत, त्यामुळे माझ्यासारखा सहनशील माणसालाही आता हे सहन होण्याजोगे नाही. त्यामुळे त्यांच्या बेलगाम वक्तव्याचा उद्या समाचार घेणार असल्याचे केसरकरांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office