अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात सध्या बनावट डिझेल प्रकरण चांगलेच गाजत आहे,ह्या प्रकरणात राज्यमंत्री तनपुरे यांचे सहकारी शब्बीर देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
काही दिवसांपूर्वी तनपुरे यांचे विरोधक व माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी थेट आरोप केले होते व ह्या सर्व प्रकरणात एक मंत्री असल्याचा आरोप केला होता.
या सर्व वादावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. माझ्यावर होणार्या आरोपांकडे मी लक्षही देत नाही.
माझे लक्ष पुर्णत: विकास कामाकडे आहे. राष्ट्रवादी भवनमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. या प्रकरणात राष्ट्रवादीचे शब्बीर देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याकडे लक्ष वेधले असता,
राष्ट्रवादी काँग्रेस चुकीचे काम करत असलेल्यांना पाठीशी घालत नाही. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्याचा निर्णय कोर्टात होईल.असे स्पष्टीकरण दिले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved