अहमदनगर :- राज्यात स्थीर सरकार देण्यासाठी सकारात्मक निर्णय होईल. त्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याची माहिती कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी दिली.
राज्यातील राजकीय घडामोडींत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, साहेब निर्णय घेतील तो निर्णय योग्यच असेल.
लोकांना बदल हवा असलेले नवे सरकार राज्यात लवकरच स्थापन होणार आहे. तिन्ही पक्षांचे जाहिरनामे एकत्रित करून एक विकासाचा कार्यक्रम निश्चित केला जाणार असून
त्यावर राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी सकारात्मक निर्णय होईल. त्यादृष्टीने पावले टाकली जात असल्याची माहिती आमदार पवार यांनी दिली.
पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळविण्यासाठी रोहित पवार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.