अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या फिरोज राजू शेख व आदित्य सुधाकर चोळके यांना न्यायालयीन कोठडी तर ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे, सागर उत्तम भिंगारदिवे व ॠषीकेश उर्फ टम्या वसंत पवार यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधिश उमा बोऱ्हाडे यांनी दिले आहेत.
पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपत असल्यामुळे त्यांना दुपारी तिन वाजता न्यायालयात हजर करण्यात आले. सुरूवातीस पाचही आरोपींची ओळख परेड करण्यात आल्यानंतर तपासी अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित पाटील यांनी २४ नोहेंबर रोजी मयत रेखा जरे यांचा अपघात घडवून आणण्यात येणार होता.
त्यातील आरोपी तसेच त्या घटनेत वापरण्यात येणारा ४०७ टेम्पो हस्तगत करायचा आहे, हत्याकांडाचा सुत्रधार बाळ बोठे याने हत्याकांडासाठी दिलेल्या सुपारीची उर्वरीत रक्कम हस्तगत करायची आहे, अटक करण्यात आलेल्या आरोपींना आजूनही साथीदार असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची विचापूस करणे आवष्यक आहे, विविध ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले असून त्याअनुषंगाने सखोल चौकशी करायची असल्याने दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी तर तिघांना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयास केली.
न्यायालयाने पाटील यांनी विनंती मान्य करून राजू शेख व आदित्य चोळके यांना न्यायालयीन तर ज्ञानेश्वर शिंदे, सागर भिंगारदिवे व ॠषीकेश पवार यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपी फिरोज शेख व आदित्य चोळके यांचा पोलिस कोठडीचा अधिकार शाबूत ठेउन ओळख परेडसाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती.
ती न्यायायाने मान्य केली. सोमवारी न्यायालयात पाचही आरोपींच्या वतीने वकील उपस्थित होते. चोळके या आरोपीसाठी स्वतंत्र वकील उपस्थित होता. या गुन्हयातील दुचाकी, हत्यार, जप्त करण्यात आले आहे. हत्येचा सुत्रधार आजूनही फरार असला तरी त्यामुळे या आरोपींना पोलिस कोठडीची आवष्यकता नाही. सहा दिवसांत जुजबी तपास करून पुन्हा पोलिस कोठडी मागण्यात येत असल्याचे आरोपींच्या वतीने सांगण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved