रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपींची नावे समोर,पण मास्टरमाईंड…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. 

तपासला प्रगती असून पुढील आरोपींच्या शोधात पोलिस आहेत. हे हत्याकांड सुपारी देऊन झाल्याचा पोलिसांचा दावा असून याप्रकरणी ही सखोल तपास करत आहेत.

यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास खून करण्यात आल्याने जिल्हात एकच खळबळ उडाली होती . 

पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात त्यांच्यावर हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले होते. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला 

या प्रकरणी पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ६ पथके तयार केली आहेत.

पोलिसांनी मंगळवारी विविध ठिकाणाहून तीन आरोपींना अटक केली होती. या तिघांना बुधवारी दुपारी पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने तिघांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़.

गुड्डू शिंदे (कोल्हार) आणि फिरोज शेख (श्रीरामपूर) या दोन्ही मारेकऱ्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.दरम्यान धक्कादायक म्हणजे ह्या दोघांनी आदित्य चोळके (राहुरी) याच्या सुपारीवरून ही हत्या केली आहे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले. 

तसेच चोळके यास केडगाव येथील भिंगारदिवे याने ही सुपारी दिली होती व भिंगारदिवे याला नगर शहरातून सुपारी दिल्याची चर्चा सुरु असून ह्या सर्व प्रकरणातील मास्टरमाइंड पर्यंत पोहोचणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24