अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- करोना नियंत्रणात आल्यामुळे राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरू केला आहे. त्यानुसार शाळा- महाविद्यालये सुरू करण्यात आली असून आता अन्य निर्बंधही शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.
अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून, आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. राज्यात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढू लागताच सरकारने नववर्षांच्या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबरपासून राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू केले होते.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील करोनाबाधितांचा आलेख घसरत आहे. राज्यातील करोनास्थिती नियंत्रणात आल्याचा दावा सरकारने उच्च न्यायालयातही केला आहे.
यामुळे निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. करमणूक पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने, उपाहारगृह, नाटय़गृह,
चित्रपटगृहे स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेने, मनोरंजनात्मक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या २५ टक्के किंवा २०० लोकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आह़े