मंगळवारी ‘खरेदिवाला’चा नामांतर सोहळा; दिवाळीनिमित्त किराणा मालावर ५० टक्क्यांपर्यंत सूट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-  लोकरंग कॉर्पोरेशनच्या घरपोहोच किराणा सेवेला अहमदनगर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दीड वर्षात नगरमधील हजारो ग्राहकांचा विश्वास आम्ही संपादन केला आहे.

अशावेळी काळाची पावले ओळखून आम्ही आणखी वेगळ्या रंग-ढंगात ग्राहकांना सेवा देण्यासाठी तयार झालेलो आहोत. त्यासाठी फ़क़्त ‘खरेदिवाला’ असे नामांतर न करता ग्राहकांना २ ते ५० टक्क्यांपर्यंत सूट देण्याचीही घोषणा संचालिका माधुरी चोभे यांनी केली आहे.

लोकरंगचे नामांतर ‘खरेदिवाला’ असे करण्याचा कार्यक्रम मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर २०२०) अश्विन शुद्ध एकादशीच्या निमित्ताने सकाळी १० वाजता होणार आहे.

करोना विषाणूची साथ असल्याने सर्व नियम पळून आणि खूप मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत फेसबुक पेजवर लाइव्ह प्रसारण करून हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

त्यासाठी आपण सर्वांनी आशिर्वाद देण्यासाठी खरेदिवाला फेसबुक पेजवर त्यावेळी यावे असे आवाहन माधुरी चोभे यांनी केले आहे. आम्ही हा स्टार्टअप सुरु करताना ग्राहकांच्या सेवेलाच प्राधान्य दिले होते.

समाधानी ग्राहकांच्या मदतीनेच आम्ही आता एक विश्वासार्ह आणि यशस्वी अशी संस्था म्हणून नगर शहरात उभे राहिलो आहोत.

ग्राहकांना दर्जेदार किराणा माल थेट घरपोहोच देण्याची आमची नगर शहरातील अशी पहिलीच सेवा आहे. मोफत घरपोहोच किराणा घरी गेल्यावर ग्राहकांकडून आम्ही पैसे घेतो. अनेकांना याचे कौतुक वाटायचे. तर, काहींना आम्ही छुपा नफा कमवीत असल्याचेही वाटायचे.

मात्र, आता यातील गैरसमज दूर करण्यात आम्हाला यश आलेले आहे. माफक नफा करवून ग्राहकांचा विश्वास कमविण्याचे ‘खरेदिवाला’चे धोरण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

नगर तालुक्यातही मिळणार डिलिव्हरी सर्विस :-

माधुरी चोभे यांनी सांगितले आहे की, खरेदिवाला हे ग्राहकांनी लावलेले आणि मोठे केलेले रोपटे आहे.आम्ही आता लोकरंग हे नाव बदलून जागतिकीकरणाच्या संधी शोधण्यासाठी ‘खरेदिवाला’ असे नाव घेऊन आम्ही येत आहोत.

यापुढील काळात दुकानात किराणा मालाची खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना एमआरपी मूल्यावर २ ते ५० इतकी हमखास सूट दिली जाणार आहे.

नगर शहरातील ग्राहकांना घरपोहोच सेवा देतानाही अशाच पद्धतीने सूट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी एक किलोमीटर क्षेत्रातील ग्राहकांना कोणतेही डिलिव्हरी शुल्क नसेल.

मात्र, लांबच्या ग्राहकांना २० ते ४५ रुपये इतके डिलिव्हरी शुल्क द्यावे लागेल. तसेच नगर तालुक्यातील इतर गावांमधून ग्रुपने किराणा मालाची ऑर्डर असल्यास त्यांनाही नाममात्र डिलिव्हरी शुल्क घेऊन घरपोहोच किराणा सेवा दिली जाणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24