पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचविले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पुराचे स्वरूप आले आहे.

दरम्यान नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील तुवर वस्तीनजीक ओढ्यातील पुराच्या पाण्यात वाहून जात असलेल्या मिरी येथील तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचविले.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील आण्णासाहेब ज्ञानदेव नेहूल हा तरुण नेवासा तालुक्यातील करजगाव येथे आपल्या पाहुण्यांकडे भेटायला आला होता.

जोरदार पावसाने शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील तुवर वस्तीनजीक ओढ्याला पूर आलेला असतांना या तरुणाने आपल्या पत्नीला मोटारसायकलवरुन खाली उतरविले व स्वतः मोटारसायकल पाण्यात घातली.

पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्याच्या प्रवाहा सोबत वाहत गेला. ओढ्यात असलेल्या झाडाला अडकल्याने त्या झाडाला पकडून तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या पत्नीने आरडाओरड केला.

त्या आवाजाने शेजारील तुवर वस्तीवरील काही युवक पळत आले. त्यांनी सर्व घटना बघताच त्यांनी तात्काळ दोरखंड आणले. दोरखंड एकमेकांना बांधून त्या तरुणापर्यंत मोठ्या जिकरीने पोहचवला.

दोरखंडाने त्याला ओढून प्रवाहाबाहेर काढले. युवकाची बजाज मोटरसायकल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. अद्यापपर्यंत सापडलेली नाही. तरुणास वाचवल्याबद्दल नामदार शंकरराव गडाख यांनी वरील सर्व युवकांचे अभिनंदन केले

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24