या नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या काळात देशात बिहारमध्ये निवडणूक झाली व कोणत्याही क्षणी या निवडणुकीचा निकाल घोषित होईल. त्याचबरोबर नगर जिल्ह्यातही निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.

यातच अकोले पाठोपाठ आता कर्जत येथील नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये विद्यमान नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांची कोंडी झाली आहे.

त्यांना आता नवीन प्रभाग शोधून निवडणूक लढवावी लागणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यापैकी कोणाच्या ताब्यात ही नगरपंचायत जाते, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.

नवीन प्रभाग निहाय पडलेले आरक्षण पुढीलप्रमाणे : प्रभाग -एक – नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग दोन – नागरीकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, प्रभाग – तीन – नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला,

प्रभाग – चार- सर्वसाधारण स्त्री, प्रभाग – पाच – नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, प्रभाग – सहा – सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग – सात- सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग – आठ – सर्वसाधारण व्यक्ती,

प्रभाग – नऊ – सर्वसाधारण महिला, प्रभाग – दहा- सर्वसाधारण महिला, प्रभाग -अकरा – नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग – बारा- सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग – तेरा – सर्वसाधारण व्यक्ती,

प्रभाग – चौदा- सर्वसाधारण महिला, प्रभाग – पंधरा – अनुसूचित जाती पुरूष, प्रभाग – सोळा – अनुसूचित जाती महिला, प्रभाग – सतरा – सर्वसाधारण महिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24