अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला.
त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून रविवार दि. 13 ते 20 सप्टेंबरपर्यंत होणार्या सर्वपक्षिय श्रीरामपूर लॉकडाऊनला प्रतिसाद देऊन
आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे असे आवाहन श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे रमेश गुंदेचा, राजेंद्र पवार, किराणा असोसिएशनचे सदस्य सुमतीलाल गुजराणी यांनी केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, आपल्यासाठी व कुटुंबासाठी फक्त आठ दिवस त्यात दोन रविवार येतात म्हणजे फक्त सहा दिवसांसाठी
सर्व व्यापार्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवून श्रीरामपूर लॉकडाऊनला प्रतिसाद द्या, असे आवाहन करण्यात आले.
आपण आपल्या दुकानात जे कर्मचारी किंवा रोजंदारीवर काम करणारे जे कोणी असतील त्यांना आपण 8 दिवसांचा रोज द्यावा किंवा त्यांचे 8 दिवस घर चालेल इतके किराणा सामान,
धान्य भरून द्यावे जेणेकरुन आपले कुटुंब पण वाचेल व आपल्या कर्मचार्याबरोबर त्याचे कुटुंबही वाचेल.
आपल्याला कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे आहे. ही साखळी जर मोडली नाही तर उद्या आपले कुटुंब पूर्णपणे रस्त्यावर येईल.
या सर्व बाबींचा विचार करून आपण श्रीरामपूर लॉकडाऊनला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved