कार्तिकी यात्रेवर पुन्हा निर्बंध येण्याचे सावट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- सोलापूर- कोविड 19 संसर्गामुळे आठ महिने बंद असलेल विठ्ठल रुक्मिणी देऊळ पुन्हा सुरू झाले असले तरी कार्तिकी यात्रेवर पुन्हा निर्बंध येण्याचे सावट आहे.

कारण जिल्हा प्रशासनाने आषाढी पध्दतीने ही यात्रा करावी असा प्रस्ताव दिला आहे.यामुळे कार्तिकी यात्रा सुध्दा रद्द होण्याची शक्यता आहे.

देशभरात कोविड 19 संसर्ग अजूनही आटोक्यात आला नाही. अशातच दुसरी लाट येण्याची भीती.आरोग्य संस्थानी व्यक्त केली आहे. २६ नोव्हेंबर ला कार्तिकी एकादशी आहे.

आषाढी नंतर भरणारी ही मोठी वारी आहे. कोकण कर्नाटक भागातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरात येत असतात. मात्र या यात्रेला गर्दी होऊन कोविड 19 संसर्ग वाढण्याची भीती आहे.

आषाढी रद्द झाल्याने कार्तिकीला भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे.यामुळेच जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून आषाढी एकादशी प्रमाणेच कार्तिकी यात्रा सुध्दा प्रतिकात्मक रूपात साजरी करावी.

तसेच आषाढी यात्रा पध्दतीने नियम असावे असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला आहे. यामुळे आता आषाढी वारी पध्दतीने कार्तिकी यात्रा रद्द

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24