अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- मुंबई येथे पोलिस सेवेमध्ये असताना कुप्रसिद्ध गुंड माया डोळस गॅंगचा खात्मा करणाऱ्या टीममध्ये भाग घेऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने ज्यांचा गौरव केला असे श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावचे सुपुत्र सेवानिवृत्त पोलीस अंकुश ठवाळ यांचे बुधवार दि. २९ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास अल्पश्या आजाराने मुंबई येथे उपचारादरम्यान दुखःद निधन झाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा बंद केल्यामुळे त्यांचे मुलास वडिलांना अग्निडाग देण्यास जाता आले नाही.मुलाने व्हिडीओ कॉलद्वारे वडिलांना अखेरची वाहिली श्रद्धांजली.
अंकुश ठवाळ यांना काही दिवसासपूर्वी अचानक त्यांना पोटामध्ये खुप त्रास व्हायला लागल्याने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले होते. दरम्यान त्यांचा मोठा मुलगा गौरव हा आढळगाव येथे वास्तव्यास असल्यामुळे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा बंद केल्यामुळे त्यास आपल्या वडिलांना अग्निडाग देण्यास जाता आले नाही
त्यामुळे सर्वत्र परिसरातून याबाबत हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. महाराष्ट्र पोलीस खात्यात मुंबई येथे नोकरी केलेले श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील रहिवाशी अंकुश ठवाळ हे नोकरीतनिमित्त अनेक वर्षे मुंबईत वास्तव्यास होते त्यांना दोन मुले एक गौरव व अर्जुन यांना चांगले संस्कार देत वाढवून पोलीस खात्यात यशस्वीपने कामगिरी केली.
आपल्या पोलीस खात्यात त्यांनी अनेक धाडसी मोहीम राबविण्यात सहभाग घेतला. लोखंडवाला शूटआउट मध्ये माया डोळस गॅंग चा खात्मा करण्यात ते आघाडीच्या टीम मध्ये होते. त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र सरकारने त्यांचा गौरव केला होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®