महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांच्या फोटोला जोडे मारले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

औरंगाबादला संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आज (२ डिसेंबर) रोजी ‘मराठा ठोक क्रांती मोर्चाकडून’ आक्रमक आंदोलन करण्यात आले.

औरंगाबादचे संभाजीनगर करावी, अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. या मागणीसाठी अनेक वर्षांपासून आंदोलने सुरू आहे. या मागणीने मागील काही दिवसांपासून जोर धऱला आहे.

अशी भुमीका आंदोलकांनी स्वीकारली. आंदोलनादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, अशी मागणी केली.

फक्त एव्हडेच नाही तर ज्यांनी या प्रस्तावाला विरोध केला असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही मराठा आंदोलकांकडून निषेध करण्यात आला.

दरम्यान,आंदोलकांनी बाळासाहेब थोरात यांच्या फोटोला जोडे मारत तो फाडण्याचा देखील प्रयत्न केला.या प्रकारानंतर पोलिसांनी ताबडतोब या आंदोलकांना ताब्यात घेतले.

अहमदनगर लाईव्ह 24