अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- आपण कायम राज्यघटनेच्या तत्त्वाशी निगडित अशा काँग्रेसचा विचार जपला आहे. आणि तो शाश्वत आहे. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय चांगले काम करत असून आलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी आपण घराबाहेर पडणे टाळून सरकारला सहकार्य केले पाहिजे.
सोशल डिस्टन्स पाळणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असून तरुणांनी स्वत:च्या जीवनात सकारात्मकता वाढवताना असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास जीवनात यश नक्की मिळेल असा मौलिक सल्ला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी तरुणांना दिला आहे.
सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित छत्रपती यूथ फेस्टिवलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्रातील साठ वर्षाची जडण-घडण, सहकार, अर्थकारण, महाराष्ट्रातील विविध मुख्यमंत्री, ग्रामीण विकास, शिक्षण, अशा विविध विषयावर नामदार थोरात यांनी तरुणाशी मुक्तपणे संवाद साधला.
ते म्हणाले यामध्ये ग्रामीण विकास महत्त्वाचा असून प्रत्येकाने आपापले काम प्रामाणिकपणे केले तर जीवनात यश मिळेल आणि राज्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. कोरोणारुपी संकट काळात काळामध्ये प्रत्येकाने सोशल डिस्टन्स व शासनाचे नियम पाळावे असे आवाहन करताना घराबाहेर पडणे टाळा असा मौलिक सल्लाही महाराष्ट्रातील तरुणांना दिला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®