अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- बिहारच्या सर्व जनतेला कोरोना वरील लस मोफत देण्यात येईल’ अशी घोषणा काल भाजपाने केली आहे. आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात भाजपाने हि घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण थोडे तापले आहे.
या वक्तव्याप्रकरणी विरोधी पक्षाकडून हल्लाबोल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यातच महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी देखील भाजपाच्या या घोषणेवर चांगलीच टीका केली आहे.
यावेळी महसूलमंत्री थोरात म्हणाले कि, भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत.
म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का? केंद्र सरकार गोरगरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का? असे प्रश्न थोरात यांनी विचारले आहेत.
‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते आणि बिहार भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी, मोदीजींचे बिहारवर जास्त प्रेम आहे असे म्हटले होते.
मग महाराष्ट्रावर मोदींचे प्रेम नाही का?असा प्रश्नही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केले आहेत. ‘कोरोना महामारीने जनता त्रस्त आहे.
अजून कोरोनाची लस उपलब्ध झालेली नाही त्यातच मतासाठी मोफत लस वाटप हा केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे. प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मोफत मिळणे हा त्यांचा अधिकार आहे,
तो त्यांना मिळालाच पाहिजे. मोफत लस देणार हा केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आह’, अशी टीका करत थोरातांनी भाजपाच्या मोफत लसीच्या आश्वासनाचा समाचार घेतला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved