महसूलमंत्री थोरात कडाडले; दिला ‘हा’ मोठा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- मोदी सरकारने नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहात कृषी विधेयक मंजूर केले.

परंतु हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.अनेक शेतकरी संघटना यविरोधात आक्रमक झाल्या आहेत.

विरोधकांनीही यावर आवाज उठवला. परंतु काही खासदारांना निलंबित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कडाडले.

कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय खासदारांचा विरोध असतानाही केंद्रातील भाजप सरकारने चर्चा न करता विरोधी पक्षांच्या सदस्यांना निलंबीत करून ही विधेयकं मंजूर करुन घेतली.

केंद्र सरकार सातत्याने लोकशाहीची मुल्ये व संसदीय नियम पायदळी तुडवत आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. सरकारने हे काळे कायदे मागे घ्यावेत यासाठी देशभरातील शेतकरी आंदोलन करत आहेत.

काँग्रेस पक्ष या शेतकर्‍यांसोबत असून कायदे मागे घेईपर्यंत संघर्ष करत राहिल, असा इशारा थोरात यांनी दिला आहे. मंत्री थोरात म्हणाले,

केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा निषेध करत काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. आज राज्यभरात SpeakUpForFarmers ही ऑनलाईन मोहीम चालवण्यात आली.

या मोहिमेत काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. केंद्रातील भाजप सरकार गेल्या सहा वर्षांपासून शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे.

आपल्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी संसदेचे नियम व लोकशाही पायदळी तुडवून कृषी विधेयके मंजूर करून नरेंद्र मोदी सरकार या देशातील शेतकर्‍यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवू पाहत आहे.

केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कायद्यामुळे कृषीक्षेत्रात कंपनीराज येणार आहे असा आरोपही त्यानी मागे केला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24