महसूलमंत्र्यांनी दिला व्यापाऱ्यांना इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्यांना विरोध करताच महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नवा कायदा तयार करण्याचे संकेत दिले आहेत.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्र्यांची समिती गठीत केली जाणार आहे. तसेच व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना आधारभूत किंमत दिली नाही तर त्यांच्यावर खटला दाखल करण्याची तरतूद करत करण्यात येणार आहे,

असं बाळासाहेब थोरात यांनी आज स्पष्ट केलं. बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना ही माहिती दिली. केंद्राने पास केलेला कृषी कायदा शेतकरी विरोधी आहे.

त्याला विरोध म्हणून 2 कोटी शेतकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना देण्यात येणार आहे. सोनिया गांधी हे निवेदन राष्ट्रपतींना देणार आहेत.

या 2 कोटी सह्यांपैकी एकट्या महाराष्ट्रातूनच 60 लाख सह्या झाल्या आहेत. आम्ही आधी शेतकऱ्यांना केंद्राचा कायदा समजावून सांगितला.

त्यानंतरच त्यांच्या सह्या घेतल्या, आज हे निवेदन दिल्लीला पाठवण्यात येणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं. जुलमी कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी २ कोटी सह्यांची मोहिम राबवण्याचे निश्चित केले होते.

२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेसाठी गावपातळीपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24