अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून अमृतवाहिनीत होत असलेल्या मेधा सांस्कृतिक महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता सैराट फेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरु व हास्यकलावंत भाऊ कदम, कुशल बद्रिके, चिन्मय उदगीरकर, गायिका कार्तिकी गायकवाड, गणेश पंडित, जुईली जोगळेकर, सायली पराडकर सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांनी दिली.
महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी सकाळी ११ वाजता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, एबीबी कंपनीचे अध्यक्ष गणेश कोठावदे, विश्वस्त शरयू देशमुख, युवा नेते राजवर्धन थोरात यांच्या उपस्थितीत होणार आहे.
शुक्रवारी सकाळी ११ वाजता संवाद तरूणाईंशीमध्ये पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, आमदार धिरज देशमुख, आमदार ऋतुराज पाटील, आमदार झिशान सिद्दकी आदींच्या मुलाखती महाराष्ट्रातील आघाडीचा गायक व संगीतकार अवधूत गुप्ते घेणार आहेत.
सायंकाळी ६.३० वाजता सैराटफेम आर्ची ऊर्फ रिंकू राजगुरु व हास्यकलावंत भाऊ कदम, कुशल बद्रिके, चिन्मय उदगीरकर, गायिका कार्तिकी गायकवाड, गणेश पंडित, जुईली जोगळेकर, सायली पराडकर, आकाश हांडे कार्यक्रमात सहभागी होतील.