रिंकू राजगुरु ‘या’ हिंदी चित्रपटातून येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-अभिनेत्री रिंकू राजगुरुने सैराट सिनेमातून अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. तिच्या अभिनयाने ती रातोरात स्टार झाली. महाराष्ट्रात तर सैराट सिनेमानंतर आर्चीची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली.

सोशल मीडियावरसुद्धा रिंकू सक्रिय असून ती नेहमीच चाहत्यांसाठी खास फोटो शेअर करत असते. पण ती सध्या काय करतेय? असा प्रश्न तिच्या सगळ्याच चाहत्यांना पडला असणार.

रिंकू राजगुरु तिच्या हंड्रेड या हिंदी वेबसीरिजनंतर अमेझॉन प्राइमवरील ‘अनपॉज्ड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये रिंकूचा एक वेगळाच अंदाज चाहत्यांना पाहता येणार आहे.

गुरुवारी अ‍ॅमेझॉन प्राइमने ‘अनपोज्ड’ या पाच शॉर्ट फिल्मचा टीझर रिलीज केला. यामध्ये ‘द फॅमिली मॅन’ फेम राज एंड डीके यांनी एक शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली आहे. ज्यामध्ये गुलशन देवैया आणि सैयामी खेर हेदेखील आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24