अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- एकीकडे नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडलेले आहे, याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना व वाहनधारकांना करावा लागतो आहे.
दरम्यान राज्याचे महसूलमंत्री यांनी त्यांच्या तालुक्याच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात मजबूत रस्त्यांचे जाळे निर्माण होत असून,
जिल्हा परिषदेच्या निधीतून चिकणी, निमगाव भोजापूर ते राजापूर या रस्त्यांच्या डांबरीकरण व मजबुतीकरणाच्या 50 लाख रुपये निधीच्या कामाचा शुभारंभ कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात व
जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांच्या हस्ते करण्यात आला. चिकणी येथे जिल्हा परिषदेच्या प्राप्त निधीतून चिकणी ते निमगांव भोजापूर रस्त्ता (10 लाख), निमगाव भोजापूर ते राजापूर रस्ता (10 लाख),
थोरात यांच्या निधीतून चिकणी ते हरिभाऊ वर्पे वस्ती (15 लाख), जिल्हा परिषद सदस्य निधीतून चिकणी ते उदय वर्पे वस्ती (15 लाख) असे 50 लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved