घरी निघालेल्या पादचाऱ्यास लुटले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पुण्यात कामानिमित्ताने राहत असलेला व लॉकडाउनमुळे अडकून पडलेला तरुण यवतमाळ येथे आपल्या घरी पायी निघाला असताना अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील संगम ब्रिज परिसरात लुटण्याचा प्रकार घडला.

याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पायीच घरी निघालेला हा युवक रात्रीच्या वेळी अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात आला असता काही युवकांनी त्याचा मोबाइल;

तसेच त्याचे साहित्य हिसकावण्याचा प्रयत्न केला; तसेच त्याला मारहाणही केली. त्या वेळी यादव त्या रस्त्याने जात होते.

त्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने गाडी थांबवून या युवकाला मदत केली.

त्या वे‌ळी लुटण्याचा प्रयत्न करणारे इतर तरुण पळून गेले त्यामुळे बाकी अनर्थ टळला. परंतु झाल्या प्रकरणाने या युवकाची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती.

अहमदनगर लाईव्ह 24