‘त्या’ विधानावरून रोहित पवार यांची भाजप नेत्यावर टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-   उत्तर प्रदेशमधील हाथरास प्रकरणावरून देशात सध्या संतापाची लाट उसळली आहे.

यातच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी या प्रकरणावर अतिशय धक्कादायक वक्तव्य केलं आहे.आता याच वक्तव्यावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्या भाजप आमदारावर टीका केली आहे.

दरम्यान हाथरास प्रकरणी सिंह म्हणाले कि, ‘मुलींचे चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात’.त्यांच्या या विधानावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भारत देशाच्या महान संस्कृतीचा जगभर कौतुक होत असताना भाजपच्या अशा लोकप्रतिनिधींकडून देशाच्या संस्कारांबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान, आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर मुलींचे चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात, असे वादग्रस्त वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24