आ. रोहित पवारांनी माजी पालकमंत्री राम शिंदे यांना पुन्हा दिला ‘हा’ मोठा धक्का !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 :  जामखेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांच्यासह १० नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागले आहेत.

आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी शहराच्या विकासासाठी कार्य करायचे आल्याचे सांगत नगराध्यक्ष निखल घायतडक व त्यांचे समर्थक दहा नगरसेवकांनी राजीनामा नाट्याला कलाटणी देत आगामी काळात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरविले आहे.

आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन त्यांनी आज हा निर्णय जाहीर केला. ‘जे स्वखुशीने येतील त्यांना सोबत घेऊन काम करू’, असे सांगत यावेळी पवार यांनी त्यांचा सत्कार स्वीकारला. त्यामुळे आता माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे आणि भाजपला हा मोठा धक्का आहे.

या घडामोडीने भाजप अंतर्गत सत्ता संघर्ष आणि नगराध्यक्ष राजीनामा नाट्याचा असा समारोप झाला. नगराध्यक्ष बदलण्यासाठी भाजपमधून घायतडक यांच्यावर दबाव येत होता.

सुरुवातीला त्यांनी आणि दहा नगरसेवकांनीही राजीनामा देण्याची घोषणा केली. नंतर अचानक राजकारण बदलून या सर्वांनी राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णय घेतला.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार प्रथमच नगर पालिकेत आले. तेथे या अकरा जणांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘नगराध्यक्ष घायतडक व दहा नगरसेवकांनी माझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचे मी स्वागत करतो. तसेच शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या हितासाठी जे माझ्या सोबत येतील त्यांना मी माझ्या सोबत घेणार आहे.

हे सर्व नगरसेवक पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच निवडून आलेले आहेत. नागरिकांनी त्यावेळीही राष्ट्रवादी म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवला आहे.

हे सर्वजण परत येणार असल्याचे कळले म्हणून मी प्रथमच नगरपालिकेत आलो आहे. या मतदारसंघात मी निवडून येण्यासाठी तुम्हा सर्वांचा वाटा आहेच. आता नगरपालिकेच्या माध्यमातून जामखेड शहरातही चांगली कामे करू.’

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24