जामखेड – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार जामखेड मधून आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा आहे.
रोहित पवार यांनीही जामखेड विधानसभा मतदार संघात भेटीगाठींचा धडाका सुरु करुन मैदान तयार करायला सुरवात केलीय.
अशाच एका दौर्यादरम्यान रोहित यांनी एका सलूनवाल्याच्या हट्टापायी थेट दर्ग्याशेजारी असणाऱ्या सलूनमध्ये केसांची कटींग करत शेव्हिंग केली.
जामखेड येथील हजरत इमाम शहा वली दर्ग्यात रोहित पवार दर्शनासाठी गेलो होते. यावेळी दर्शन घेऊन बाहेर येत असताना जवळील ‘संदीप मेन्स पार्लर’ चे मालक संदिप यांनी रोहित पवारांसोबत फोटो काढण्याची इच्छा दाखवली.
यावर रोहित यांनी त्याच्या सलून मध्ये जाऊन थेट शेव्हिंग करुन घेतली. रोहित पवार यांचे सलूनमध्ये कटींग करतानाचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेत.
रोहित पवार यांनी याबाबत फेसबुकवर पोस्ट देखील टाकलीय. ‘प्रेमाचा फोटो अन् हक्काची भेट…!’ असा शीर्षक पवार यांनी सदर फोटोला दिलंय.
कधी कधी आपल्यावर असलेल्या व्यक्तीचे प्रेम आणि आपले त्या व्यक्तीकडे असलेले हक्काचे काम याचा योग कसा जुळवून येतो ते पहा..! असं पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलंय.