रोहित पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राष्ट्रवादीतील राजकारण तापणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

जामखेड :- आगामी काळात कर्जत-जामखेडमधील राष्ट्रवादीतील राजकारण आणखी तापणार असल्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीच्या एका गटाचा रोहित पवार यांना विरोध असून एका गटाचा पवारांशिवाय पर्याय नसल्याचा दावा होत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी बाकी असताना कर्जत-जामखेड मतदारसंघात पवार यांच्या संभाव्य उमेदवारीवरून राजकीय वातावरण तापले आहे.

या ठिकाणी पवार यांच्याऐवजी स्थानिकांना संधी मिळावी, असा राष्ट्रवादीच्या एका गटाचा आग्रह असून

तर राष्ट्रवादीतील अन्य नेते आणि गटाकडून भाजपला शह देण्यासाठी रोहित यांच्या शिवाय पर्यायच नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24