रोहित पवार म्हणाले भाजपलाच आता ‘आणीबाणी’ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर दडपशाही व आणीबाणीचा आरोप केला जात आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही भाजपला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर तोफ डागली आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांना ‘अभिनेता’ म्हणून हिणवलं आहे.

भाजपलाच आता ‘आणीबाणी’ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही. भाजप सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केले गेले. त्यावेळी भाजपला ‘आणीबाणी’ आठवली नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.

दरम्यान रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारवर दडपशाही व आणीबाणीचा आरोप केला जात आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही भाजपला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर तोफ डागली आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांना ‘अभिनेता’ म्हणून हिणवलं आहे.

वाचा रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट :- भाजपच्या काळात आजवर सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली गेली, द वायर, NDTV, द प्रिंट या माध्यमांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला गेला, तेंव्हा मात्र आज गळे काढणाऱ्या भाजपच्या नेत्यांना ‘आणीबाणी’ आठवली नाही. पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या ‘अभिनेत्यावर’ कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवलंय.

पण याच ‘अभिनेत्या’मुळं एका सामान्य व्यक्तीने आपल्या आईसह आत्महत्या केल्याचा आरोप असो, ‘सोशल मीडिया हब’सारख्या यंत्रणेमार्फत लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा मध्यंतरी केंद्राने केलेला प्रयत्न असो किंवा पत्रकारांचा हक्क हिरावून घेणारा कायदा करण्याचा केलेला प्रयत्न मात्र त्यांना दिसत नाही. हा कसला दुटप्पीपणा? भाजप किती दिवस अशा दोन डगरींवर हात ठेवून आपलं राजकीय पोट भरणार आहे?

एखाद्या सामान्य नागरिकावर अन्याय झाला असेल तर त्याचा तरी विचार करणार की नाही? विशेष म्हणजे ही काही त्यांच्याप्रमाणे सुडाने केलेली कारवाई नाही, तर कायदेशीर प्रक्रिया आहे आणि यामध्ये तुम्हाला बचाव करण्याची पूर्ण संधी असते. असं असतानाही पोलिसांच्या या कारवाईविरोधात एवढे गळे काढण्याचं कारण समजत नाही!

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24