अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काल विधानभवन परिसरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ३६ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
या नावांमध्ये रोहित पवार यांचे नाव असेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही.
हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !
मंत्रीपद न मिळाल्यामुळे मी व्यक्तिगत नाराज नाही. ज्यांनी-ज्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांना मी शुभेच्छा दिले आहे, अशी प्रतिक्रिया कर्जत जामखेड चे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली.
हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार
पवार म्हणाले, “मी त्या मतदारसंघातून निवडून येतो, तेथील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा होत्या त्यांनी त्या बोलून दाखवल्या आहेत. त्यांचे मी आभार मानतो. पण माझी कुठलीही नाराजी नाही.
हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !
शेवटी मतदारसंघांमध्ये काम करायचे आहे. त्यांचे प्रश्न सोडवायचे आहे”. त्यासाठी प्रयत्न करत आहे आमदाराची ताकत कमी नसते. मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करायचे असतात त्यामुळे मी कुठे नाराज नाही, असे ते म्हणाले.
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …
रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे सर्व नवनिर्वाचित मंत्र्यांचे अभिनंदन करत राज्याला पुन्हा प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी महाआघाडीचे सर्व नवनिर्वाचित मंत्री प्रयत्नशील राहतील असा विश्वास व्यक्त केला आहे.