अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- माजी खासदार नीलेश राणे यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.नीलेश राणे यांनी स्वत:च्या करोना चाचणी अहवालाबाबत एक ट्वीट केलं होतं. ‘करोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-१९ रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
माझी तब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी,’ असं आवाहन नीलेश राणे यांनी केलं होतं.
दरम्यान नीलेश राणे यांचं हे ट्वीट रोहित पवार यांनी रीट्वीट केलं आहे. ‘नीलेशजी लवकर बरे व्हा. सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत,’ असं रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
रोहित पवार यांच्या ह्या ट्वीटनंतर माजी खासदार निलेश राणे यांनी देखील मी आपला आभारी असल्याचे ट्विटद्वारे सांगितले. या मुळे या दोघांतील दिलजमाईची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved