अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने गेल्या काही महिन्यांपूर्वी गळफास घेत आत्महत्या केली होती. हि आत्महत्या आहे कि हत्या या संशयाच्या भोवऱ्यामुळे अनेक दिवस देशातील राजकारण ढवळून निघाले.
मुंबई पोलीस तपास करत असलेला हे प्रकरण त्यांच्याकडून काढून घेण्यात आले. व काही राजकारण्यांनी मुंबई पोलिसांची बदनामी केली व जेव्हा आज सुशांत प्रकरणाचा एक अहवाल एम्स या हॉस्पिटल मधून जारी करण्यात आला,
तेव्हा रोहित पवार यांनी आक्रमकता घेत नाव घेता भाजपाला चांगलाच टोला लागवला आहे. याबाबत माहिती अशी कि, अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवीन नवीन तथ्य समोर येत आहे.
दरम्यान आज एम्स हॉस्पिटलची रिपोर्ट समोर आली आहे त्यामध्ये सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली नाही हे आज स्पष्ट झाले आहे .
याच रिपोर्टचा आधार घेत कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पार्टी वर टीका केली आहे हे टीका त्यांनी ट्विट करत केली.
त्यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की बिहार निवडणूक साठी जे लोक सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्या प्रकरणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत होते.
त्यांच्या मनसुबे यावर आज एम्सची रिपोर्ट ने पूर्णपणे पाणी फेरले आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. ज्या लोकांनी आमच्या महाराष्ट्राची आणि
आमच्या मुंबई पोलिसांची बदनामी केली त्या सर्व लोकांनी तोंड न लपवता जाहीरपणे महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची बदनामी केल्याबद्दल माफी मागावी असा टोला त्यांनी लगावला आहे.