अहमदनगर Live24 ,15 जून 2020 :आमदार रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत राम शिंदे यांना पराभूत केल्यापासून राम शिंदे यांचे वाईट दिवस सुरु आहेत.
भाजपाची राज्यात सत्ता गेली, नंतर विधानपरिषदेवर शिंदे यांना घेण्यात आले नाही यामुळे माजीमंत्री शिंदे यांच्या राजकीय कारकीर्द वर प्रश्न उठत आहेत.दरम्यान हे सर्व सुरु असतानाच आमदार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदेना जोरदार झटका मिळाला आहे.
जामखेड शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष निखील घायतडक व त्यांचे दहा समर्थक नगरसेवकांनी माजी मंत्री राम शिंदे यांची तीन वर्षांपासून असलेली साथ सोडून राजीनामा नाट्याला कलाटणी दिली आहे.
आगामी काळात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरविले असल्याचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी सांगितले आहे.
नगराध्यक्ष निखिल घायतडक म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दबाव येत असल्याने पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते.
यामुळे समर्थक दहा नगरसेवकांनी देखील तातडीने आपल्या नगरसेवक पदांचे राजीनामे माझ्याकडे दिले होते. दरम्यान नगराध्यक्ष कधी राजीनामा देतात याकडे भाजपचे लक्ष होते.
परंतु त्यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय फिरवत पुन्हा राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेऊन साडेतीन वर्षांपासून भाजप बरोबर असलेले संबध तोडले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews