रोहित पवारांची आजोबांना वाढदिवसाची ‘अनोखी’ भेट , वाचा काय केले …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनीदेखील त्यांना खास प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा,” असं ट्विट रोहित पवारांनी केलं.

तसंच रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांना एक पत्रही दिलं.हे पत्रच त्यांनी आजोबांना भेट म्हणून दिले आहे.यानंतर त्यांनी हे पत्र ट्विटर वर देखील शेअर केले आहे. या दोन पानी पत्रात रोहित पवार यांनी शरद पवारांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या भावना मांडाव्यात असा विचार मनात आला आणि तुमच्याबद्दल नेहमीच एक आदरयुक्त भिती वाटत असल्याने माझ्या भावना पूर्णपणे आणि खुलेपणाने व्यक्त करता येणार नाहीत, म्हणून मी हे पत्र लिहितोय.

यात काही चूक झाली तर आपण मला माफ कराल, असा विश्वास आहे. कदाचित काही लोक म्हणतील की असं जाहीर पत्र लिहिण्याची काय गरज आहे? पण तुमचं संपूर्ण आयुष्यच सार्वजनिक असल्याने आणि

पत्रासारखं दुसरं सुंदर माध्यम नसल्याने वाढदिवसानिमित्त मी माझ्या भावना या पत्रातून मांडत असल्याचे रोहित पवार यांनी यात नमूद केले आहे. या पत्रात त्यांनी आजोबांच्या कार्याचे भरभरुन कौतुकही केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24