Royal Enfield : भारतीय बाजारात रॉयल एनफिल्डने स्वतःची एक वेगळीच दहशद निर्मण केली आहे. अशा वेळी सर्वाधिक लोक Royal Enfield ची बाइक खरेदि करतात.
सध्या अशीच एक बाइक Royal Enfield लॉन्च करणार आहे. रॉयल एनफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांनी याला दुजोरा दिला आहे. स्टार्क फ्युचरच्या सहकार्याने कंपनी ही इलेक्ट्रिक बाइक विकसित करत आहे.
ब्रँडची Stark Future सोबत धोरणात्मक भागीदारी आहे, कारण त्यांनी कंपनीमध्ये €50 दशलक्ष गुंतवणूक केली आहे. ही नवीन इलेक्ट्रिक मोटरसायकल कधी लॉन्च केली जाईल हे सध्या तरी निश्चित झालेले नाही. मात्र, पुढील वर्षी या ईव्हीचे अनावरण होण्याची शक्यता आहे.
आयशर मोटर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल म्हणाले, “आम्ही आमच्या EV प्रवासात आत्मविश्वासाने पावले टाकत आहोत, कारण आम्ही आमच्या EV मोटरसायकल प्लॅनमध्ये लक्षणीय प्रगती केली आहे. स्टार्क फ्युचरसोबतची आमची भागीदारीही चांगली सुरुवात झाली आहे.
बॅटरी आणि मोटर इन हाऊस बनवण्यावर भर
याशिवाय रॉयल एनफिल्ड बॅटरी आणि मोटर्स इन हाऊस बनवण्यावर भर देत आहे. ब्रँड नवीन पुरवठा भागीदार साइन अप करण्यावर आणि उत्पादन लाइन सेट करण्यावर देखील काम करत आहे. Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक मोटरसायकल अनेक उत्तम वैशिष्ट्यांसह येण्याची अपेक्षा आहे.
नवीन तंत्रज्ञानावर काम करणारी कंपनी
रॉयल एनफिल्डचे सीईओ बी. गोविंदराजन म्हणाले की, सध्या आमचे लक्ष नवीन तंत्रज्ञानावर पुरवठा भागीदारांसोबत काम करण्यावर आहे. आम्ही एक विशेष क्षेत्र स्थापन करत आहोत, ज्यामध्ये आम्ही ईव्हीसाठी प्रारंभिक उत्पादन लाइन सुरू करू.
हंटर 350cc ला खूप मागणी आहे
याशिवाय रॉयल एनफिल्डने गेल्या वर्षी हंटर 350 आणि यावर्षी सुपर मेटिअर 650 लाँच केले होते. दोन्ही मोटारसायकलमध्ये हंटर 350 ला खूप पसंती दिली जात आहे, कारण ती परवडणारी आहे. तसेच तरुणांना आणि शहराच्या हद्दीत मोटारसायकल चालवण्याची इच्छा असलेल्या लोकांना आकर्षित करते.