महाराष्ट्र

येत्या 1 जूनपासून नियम बदलणार, लायसन्ससाठी RTO मध्ये जाण्याची गरज नाही, जाणून घ्या सविस्तर..

Published by
Ahmednagarlive24 Office

वाहन चालवताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स. हे कागदपत्र जवळ असणे गरजेचे असते. ते जर नसेल तर मोठा दंड होऊ शकतो. अनेकांना लायसन्स काडःने ही गोष्ट अत्यंत किचकट वाटते त्यामुळे ते अनेक लोक ते काढताही नाहीत. परंतु आता तुमच्यासाठी एक खुशखबर आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सचा नवा नियम 1 जूनपासून लागू होत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नियमांमध्ये बदल केले आहेत. नवीन नियमानुसार, जर तुम्हाला आता ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर आरटीओला जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

नवीन ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) चाचणी घेण्याचे सध्याचे बंधन रद्द केले जाईल. ड्रायव्हिंग लायसन्स आवडीच्या जवळच्या केंद्रावर ड्रायव्हिंग मिळवणाऱ्या व्यक्तीला त्याच्या टेस्ट देण्याचा पर्याय असेल.

वैध परवान्याशिवाय जर वाहन चालवले तर मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. हे 1,000 वरून 2,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. जर अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवत असताना पकडला गेला तर आता थेट पालकांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच त्यांना 25,000 रुपयांचा मोठा दंड देखील केला जाणार आहे. तसेच वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्रही रद्द करण्याबाबत देखील कारवाई करण्यात येईल.

किती शुल्क लागणार ?
लर्निंग लायसन्स : 150 रुपये
लर्निंग लायसन्स चाचणी शुल्क : 50 रुपये
ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क : 300 रुपये

ड्रायव्हिंग लायसन्स : 200 रुपये
लायसन्स नूतनीकरण : 200 रुपये
दुसऱ्या वाहनाचे अतिरिक्त लायसन्स : 500 रुपये

जुने वाहने बाद
प्रदूषण करणारे तब्बल नऊ लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद करण्यात येणार असल्याची माहितीही मिळाली आहे.

कठोर दंड
वाहनचालक अल्पवयीन आढळल्यास 25 हजारांचा दंड केला जाईल. तसेच त्यास 25 व्या वर्षापर्यंत लायसन्स दिले जाणार नाही. मालकांची नोंदणी रद्द केली जाईल.

सुलभ अर्ज प्रक्रिया
लायसन्सची प्रक्रिया सुलभ होणार आहे. वाहनाच्या प्रकारानुसार मोजकेच कागदपत्रे लागणार आहेत.

 

Ahmednagarlive24 Office