अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 :- ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बेलापूर या गावामध्ये कमला नेहरू वसतीगृहा शेजारील मुंजोबा मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडी सोबत असलेला नंदी एका भाविकाच्या हाताने दूध पित असल्याचा प्रकार समोर आला आहे.
याचा व्हिडिओ सध्या सोशलवर जोरदार व्हायरल होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,एका फुलपात्र्यामध्ये भरलेले दूध चमच्याच्या साहाय्याने ही महिला भाविक या मंदिरातील शिवपिंडी च्या जवळील नंदीला पाजत असताना हा नंदी चमचातील दूध एका झटक्यात संपवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे.
हा प्रकार श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा असू शकतो. तर हा चमत्कार असल्याचीही चर्चा सुरू होती. मात्र दुधाचा चमच्या नंदीच्या तोंडाला लावला असता खाली न सांडता दूध मुर्ती कडून प्यायले जात होते. अशी अफवा पसरल्याने नंदीला दूध पाजण्यासाठी भाविक महिला व पुरुषांसह बालगोपाळांची गर्दी झाली होती.