अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:-भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती खुद्द सचिनने ट्विट करत दिली आहे.
“मला कोरोनाची बाधा झाली आहे. मी सर्व काळजी घेत आहे. माझी आज चाचणी झाली व त्यात माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.
माझ्या घरच्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. मी घरातच स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे व डॉक्टरांनी सांगितलेली सर्व काळजी घेत आहे.
मला मदत करणाऱ्या सर्व मेडिकल स्टाफचे मी आभार मानत आहे. सर्वांनी काळजी घ्या,” असे सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.