अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- अहमदनगर शहराचे प्रथम माजी उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ, बहिणी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
स्व. खांडरे हे स्व. गोपीनाथ मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. अहमदनगरचे विधिज्ञ अॅड. बाळासाहेब खांडरे यांचे ते बंधू होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता अहमदनगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.