अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-कोविड नियमांना अधीन राहून भाविकांसाठी खुले करण्यात आलेल्या श्री साईबाबा समाधी मंदिरातील अव्यवस्था व मनमानी कारभाराचे वस्तुनिष्ठ वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सूडभावनेतून गुन्हे दाखल केले आहेत.
हा प्रकार लोकशाहीचा चौथास्तंभ समजल्या जाणार्या माध्यमांची मुस्कटदाबी करणारा आहे. बगाटे हे शिर्डीतील नियुक्तीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत.
त्यांच्या एकूण भूमिकेची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या शिर्डीतील प्रतिनिधींवर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा त्वरीत मागे घेण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात केली.
तर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे नाशिक विभागीय कार्यकारिणीने याबाबतीत निवेदन देवून लवकरच राज्याच्या कॅबिनेट बैठकीत हा विषय मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे तडीस लावला जाईल व पत्रकारांवर केलेली कारवाई अत्यंत चुकीची असून
तातडीने त्यांच्यावरील गुन्हे शिर्डी संस्थानच्या प्रशासनाने याबाबत एक पाऊल मागे घ्यावे, चुकीचे प्रकार महाविकास आघाडीचे सरकार कधीही खपवून घेणार नाही, पत्रकारांनी केलेली बातमी तिची सतत्या पडताळून पहावी, विनाकारण पत्रकरांवर गुन्हे दाखल करु नये, अशी मागणी राज्यपत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली.