अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :मराठी चित्रपट सैराट हा चित्रपट माहित नाही असा क्वचितच सापडेल. या चित्रपटाने व त्यातील गाण्याने लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना वेड लावले.
या चित्रपटाने शंभर कोटींची कमाई करून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.
सैराटसह नागराजच्या पिस्तुल्या ही शॉर्टफिल्म आणि फँड्री चित्रपटही रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. परंतु अशा या दिग्गजाच्या वैवाहिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर त्यांची विभक्त झालेली पत्नी सध्या हलाखीचे जीवन जगत आहे.
ती इतरांच्या घरचे धुणीभांडी करत आहे. १७ मे १९९७ साली नागराजचे सुनीतासह लग्न झाले. अत्यंत साध्या पद्धतीने या दोघांचा विवाह संपन्न झाला. मात्र त्यांचा संसार फार काळ काही टिकला नाही.
२०१४ साली ते दोघे कागदोपत्री विभक्त झाले. विभक्त झाल्यावर सुनीता पुण्याच्या चिंचवड भागातील रामनगर परिसरात राहतात. पोटगी घेऊन जे पैसे मिळाले त्या पैशात सुनीता आपले गुजराण करू लागल्या.
मात्र पुढे पैशाची अडचण भासू लागल्याने त्यांनी दुसऱ्यांच्या घरची धुणीभांडी करण्याचे काम सुरू केले. घरची परिस्थिती बिकट असताना पडत्या काळात अर्धांगिनी म्हणून साथ दिली.
त्यांनी मोठे व्हावे, यश मिळवावे, यासाठी मनाला, इच्छा-आकांक्षांना मुरड घातली. त्यांच्या सैराट चित्रपटाने खूप मोठे यश मिळवले. आर्थिक कमाईही केली.
त्यातील काही तरी मिळावे, ही अपेक्षा नाही, तर ज्यांचा खऱ्या अर्थाने त्यांच्या यशात वाटा आहे, त्यांनाच यशाच्या शिखरावर आरूढ झाल्यानंतर दूर लोटावे, हे मनाला क्लेषदायक वाटते, अशी कैफियत त्यांच्या पत्नीने मांडली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews